ग्रामपंचायत निरगुडे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

स्वच्छ भारत अभियान

49

स्वच्छ भारत अभियान हे केवळ सरकारचे अभियान नसून प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून आपला गाव, तालुका, जिल्हा आणि संपूर्ण भारत स्वच्छ, सुंदर व निरोगी बनवला पाहिजे. गाव पातळीवर जागरूकता आणि सहभाग वाढवणे हेच या योजनेचे खरे यश आहे.

हर घर तिरंगा

52

"हर घर तिरंगा" हे अभियान भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (75 वर्षे पूर्ण) सुरु करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान निर्माण करणे व तिरंग्याशी असलेली आपली नाळ दृढ करणे.

घनकचरा व्यवस्थापन

56

आजच्या घडीला वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले नाही तर पर्यावरण, आरोग्य आणि संपूर्ण समाजावर त्याचे गंभीर परिणाम होतात. म्हणूनच प्रत्येक ग्रामपंचायतीला "घनकचरा व्यवस्थापन" करणे अत्यंत आवश्यक आहे.