ग्रामपंचायत निरगुडे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

53

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत निरगुडे (ह) ही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेली ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत २ जानेवारी १९५८ रोजी स्थापन झाली असून तिच्या अखत्यारीत निरगुडे (ह) आणि बेलपाली ही दोन महसुली गावे येतात. तसेच, या ग्रामपंचायतीत जांभूळपाडा, चिंचपाडा आणि करवळपाडा या वाड्या-पाड्यांचा समावेश आहे.

माहिती
माहितीचा प्रकारतपशील
ग्रामपंचायतीचे नावनिरगुडे (ह) ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
ग्रामपंचायतीचे स्थापना०२ जानेवारी १९५८
ग्रामपंचायत समाविष्ट महसुली गावे१) निरगुडे (ह), २) बेलपाली
ग्रामपंचायत पाड्या व वाड्या१) निरगुडे (ह), २) जांभूळपाडा, ३) चिंचपाडा, ४) करवळपाडा
जिल्हा परिषद गटाचे नावहरसूल ता. त्र्यंबकेश्वर
पंचायत समिती गणाचे नाववाघेरा ता. त्र्यंबकेश्वर
एल. जी. डी. (LGD) कोड१८३८३७
अक्षांश१९.९०६४७N
रेखांश७३.५५४८११७E
समुद्र सापाटीपासून उंची
नाशिक मुख्यालयापासून अंतर५९ कि.मी.
त्र्यंबकेश्वर मुख्यालयापासून अंतर३९ कि.मी.
एकूण लोकसंख्या (सन २०११ नुसार)१४५५
एकूण स्त्री संख्या७३४
एकूण पुरुष संख्या७२१
अनुसूचित जाती लोकसंख्या००
अनुसूचित जमाती लोकसंख्या१४५५
इतर लोकसंख्या००
अनुसूचित जमातीची टक्केवारी१०० %
ग्रामपंचायत एकूण सभासद संख्या०८ (स्त्री: ०४, पुरुष: ०४)  सध्या प्रशासक 
ग्रामपंचायत सदस्य वर्गवारीसर्वसाधारण: ००, अनु. जमाती: ०८, अनु. जाती: ००, इतर मागासवर्गीय: ००
एकूण वॉर्ड संख्या०३
एकूण भौगोलिक क्षेत्र१७६६.१६ हेक्टर
लागवडीखालील क्षेत्र९०१.९४ हेक्टर
पडीत क्षेत्र७५.२१ हेक्टर
गावठाण क्षेत्र७.२९ हेक्टर
गायरान क्षेत्र६.७८ हेक्टर
वनक्षेत्र७६०.४५ हेक्टर

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र.लोकसेवेचे नावकामकाजाचे दि.प्र. फीपदनिर्देशित अधिकारी
१.जन्म नोंद दाखला७ दिवस५०ग्रामपंचायत अधिकारी
२.मृत्यू नोंद दाखला७ दिवस५०ग्रामपंचायत अधिकारी
३.विवाह नोंद दाखला७ दिवस५०ग्रामपंचायत अधिकारी
४.दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला७ दिवसनिशुल्कसा.ग.ट.बि.अ
५.ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला७ दिवस५०ग्रामपंचायत अधिकारी
६.नमुना ‘८’ चा उतारा७ दिवस५०ग्रामपंचायत अधिकारी
७.निराधार असल्याचा दाखला७ दिवसनिशुल्कग्रामपंचायत अधिकारी